जिल्ह्यात आठ हजार रिक्षा विनापरवाना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:47 AM2017-08-18T00:47:31+5:302017-08-18T00:47:31+5:30

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतूक करणाºया रिक्षांची संख्या जिल्ह्यात आठ हजारच्या वर असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

 8 thousand autorickshaws in the district! | जिल्ह्यात आठ हजार रिक्षा विनापरवाना !

जिल्ह्यात आठ हजार रिक्षा विनापरवाना !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतूक करणाºया रिक्षांची संख्या जिल्ह्यात आठ हजारच्या वर असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. केवळ अडीच हजार रिक्षांना परवाना आहे. या रिक्षांविरोधात आता वाहतूक शाखेच्या वतीने शुक्रवारपासून कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार आहे.
मागील काही महिन्यांपासून अवैध प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांविरोधात कडक मोहीम हाती घेण्याच्या सूचना शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी दिल्या. त्याप्रमाणे जिल्ह्यात दोन विशेष पथके कारवाईसाठी नियुक्त करण्यात आली; परंतु तरीही रिक्षाचालक त्यांची नजर चुकवून अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्याचे समोर आले आहे. तसेच यातील बहुतांश रिक्षा या विनापरवाना धावत आहेत. हा आकडा तब्बल ८ हजाराच्यावर असल्याची माहिती पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Web Title:  8 thousand autorickshaws in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.