जखमींना शोधणाऱ्या नजरा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:03 PM2018-04-26T12:03:02+5:302018-04-26T12:04:40+5:30

विमानतळावरून उड्डाण घेतलेले विमान काही क्षणांतच जमिनीवर कोसळले. घटनास्थळावरून कमलनयन बजाज रुग्णालयाला ही माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत प्रशासनाने रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना केल्या. 

Seeing the injured ... | जखमींना शोधणाऱ्या नजरा...

जखमींना शोधणाऱ्या नजरा...

googlenewsNext

- भागवत हिरेकर 

विमानतळावरून उड्डाण घेतलेले विमान काही क्षणांतच जमिनीवर कोसळले. घटनास्थळावरून कमलनयन बजाज रुग्णालयाला ही माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत प्रशासनाने रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना केल्या. 

रुग्णावाहिकांसोबत डॉ. एकबोटे हे इतर सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले, तर रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी डॉ. टी.एस. भागवत, डॉ. ढमढेरे, डॉ. जे.एस. कंडी, डॉ. बोरकर आणि मुख्य परिचारिका के.टी. बेडेकर रुग्णालयात कर्तव्य बजावत होते. औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबरोबरच कमलनयन बजाज रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आल्याची माहिती नातेवाईकांसह नागरिकांना कळाली. त्यानंतर कमलनयन बजाज रुग्णालयात गर्दीचा ओघ वाढत गेला. रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांची धावपळ सुरू असताना नातेवाईकांच्या नजरा जखमी आणि मृत झालेल्यांचा शोध घेत होत्या. मृतांची नावे जाहीर केली का? जखमींची नावे काय आहेत, अशीच चर्चा नातेवाईकांमध्ये सुरू होती. रुग्णांवर उपचार करण्याबरोबर नातेवाईकांच्या चौकशांना उत्तरे देणे, अशी दुहेरी कसरत रुग्णालय प्रशासनाला करावी लागत होती. गर्दी आणि धावपळीने रुग्णालयाची दमछाक झालेली असताना दुपारी ४ वाजता विमानातून प्रवास करीत असलेल्या कॉलीन ग्रेग आणि कॅथरीन ग्रेग या दाम्पत्याला बजाजमध्ये दाखल करण्यात आले. 

कॅथरीन यांच्या डाव्या गुडघ्यास मुका मार लागला होता, तर कॉलीन ग्रेग यांच्या पोटाला दुखापत झाली होती. दुखापत गंभीर नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर देवाच्या कृपेने मृत्यूच्या दाढेतून आम्ही दोघे सुखरूप बाहेर पडलो, अशी प्रतिक्रिया कॉॅलीन यांच्या तोंडून बाहेर पडली.

‘त्या’ मृतदेहाची ओळख अंगठ्यावरून पटली
विमान अपघाताची घटना घडली, त्याच्या वर्षभरापूर्वीच मी घाटीत वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झालो होतो. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घाटीतून पथकासह रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या; पण त्यात आगीत होरपळलेले मृतदेहच होते. जखमींचा समावेश नव्हताच. त्यामुळे केवळ शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया करावी लागली. यात अनेक डॉक्टर कर्तव्य बजावत होते. अपघात विभागासमोेर गर्दीही होती. रुग्णालयातील प्रत्येक जण मदत करीत होता. या ५५ मृतदेहांमध्ये व्हिडिओकॉन समूहाचे मालक, उद्योगपती नंदलालजी धूत यांचाही समावेश होता. मृतदेह जळालेले असल्याने ओेळख पटविणे अवघड होते. यात एका मृतदेहाची ओळख पटविणे अवघड होते. तो मृतदेह जोशी नावाच्या गृहस्थाचा होता. नातेवाईकांना केवळ अंगठ्यावरून त्यांची ओळख पटली होती, अशी आठवण डॉ. रामदास अंबुलगेकर यांनी सांगितली.
 

Web Title: Seeing the injured ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.