Corona Virus : लोहऱ्यात जनता कर्फ्युचे उल्लंघन करणारे १५ दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2021 02:37 PM2021-05-02T14:37:34+5:302021-05-02T14:38:20+5:30

Corona Virus : तालुक्यातील आता पर्यतची ही सर्वात मोठी कारवाई

Corona Virus : 15 shops violating public curfew in Lohara sealed | Corona Virus : लोहऱ्यात जनता कर्फ्युचे उल्लंघन करणारे १५ दुकाने सील

Corona Virus : लोहऱ्यात जनता कर्फ्युचे उल्लंघन करणारे १५ दुकाने सील

googlenewsNext

लोहारा (जि.उस्मानाबाद) : लोहारा शहरासह तालुक्यातील आठ गावात जनता कर्फ्यु असताना दुकाने उघडे ठेवणाऱ्या १५ दुकाने पुढील आदेशापर्यत तहसिलदार यांनी सिल केली आहेत. तालुक्यातील आता पर्यतची ही सर्वात मोठी कारवाई असून नियमाचे उल्लघन करणाऱ्या दुकानदारांचे मात्र चांगलेच धाबे दणाणली आहेत.

लोहारा शहरासह तालुक्यात गेले दोन महीण्यापासुन दिवसनं दिवस कोरोनाचे रुग्ण दिवसाकाठी ३० ते ४० वाढत असून तालुक्यात कोरोना रुग्णांचा १७०० रुग्णांचा आकडा पार केले असून आतापर्यत ३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात लोहारा तालुक्यातील १७ गावामधील नागरीकांचे कोरोना रीपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरीकांच्या हालचाली, संपर्क निर्बध घालून मज्जाव करण्यात आला असून या गावच्या ३ किमीचा परीसर रेड झोन तर ७ किमी पर्यतचा परीसर हा बफर झोन म्हणून घोषीत करुन गावाच्या सिमा बंद करण्याचे आदेश उपविभागिय अधिकारी विठ्ठल उमदले यांनी २३ एप्रिल रोजी आदेश काढले. पण याची शहरासह ग्रामिण भागात प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने चित्र आहे.

यामुळे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व उपविभागीय अधिकारी विठ्ठल उमदले यांच्या मार्गदर्शनाखाली १ मे रोजी महाराष्ट्र दिनी स्वत: तहसिलदार संतोष रुईकर ,नायब तहसिलदार रणजित शिराळकर,लोहारा मंडळ अधिकारी बी.एस. भरनाळे, जेवळी मंडळ अधिकारी एम. एस. स्वामी,तलाठी अरुण कांबळे, एस.जी. माळी, हगंरगे,बालाजी चामे, भागवत गायकवाड यांच्यासह कोतवाल, गावस्तरावर पोलीस पाटील आदींनी शहरासह ग्रामीण भागात जनता कर्फ्युची प्रभावी पणे अंमलबजावणी केली जाते. पहाणी करत असता कडकडीत बंद पाळण्यात येत असल्याचे दिसुन आले तसेच काही किराणा दुकान मालक,हॉटेल चालक  बंद काळात लपवून व्यवसाय करताना लोहारा शहरातील ६, उत्तर जेवळी व तावशीगड प्रत्येकी दोन दोन तर नागराळ,आष्टामोड,उदतपुर, लोहारा खुर्द, माळेगाव येथील प्रत्येकी एक एक असे १५ दुकाने आढळुन आल्याने त्यांची दुकाने पुढील आदेशापर्यत तहसिलदार संतोष रुईकर यांनी सिल केली आहेत. या कारवाईमुळे जनता कर्फ्यु असताना दुकाने उघडे ठेवणाऱ्या दुकानदारांचे धाबे मात्र चांगलीच दणाणली असल्याचे चित्र आहे.

Web Title: Corona Virus : 15 shops violating public curfew in Lohara sealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.