साई संस्थानच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 12:02 AM2021-09-17T00:02:31+5:302021-09-17T00:06:54+5:30

साई संस्थानच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीत होती जोरदार रस्सीखेच

NCP MLA Ashutosh kale Appointed as President of shirdi saibaba sansthan | साई संस्थानच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची नियुक्ती

साई संस्थानच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची नियुक्ती

googlenewsNext

शिर्डी : साईबाबा संस्थानचं विश्वस्त मंडळ अखेर जाहीर करण्यात आलं आहे. विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची वर्णी लागली आहे. तर उपाध्यक्षपदी ऍड. जगदीश सावंत यांची निवड करण्यात आली आहे. 

विश्वस्त मंडळात कोणाकोणाचा समावेश?
१. आमदार आशुतोष अशोकराव काळे – अध्यक्ष
२. ऍड. जगदीश हरिश्चंद्र सावंत – उपाध्यक्ष
३. अनुराधा गोविंदराव अदिक – सदस्य
४. ऍड. सुहास जनार्दन अहेर – सदस्य
५. अविनाश अप्पासाहेब धनवटे – सदस्य
६. सचिन रंगराव गुजर – सदस्य
७. राहुल कनाल – सदस्य
८. सुरेश गोरक्षनाथ वाबळे – सदस्य
९. जयंतराव पुंडलिकराव जाधव – सदस्य
१०. महेंद्र गणपतराव शेळके – सदस्य
११. एकनाथ भागचंद गोंदकर – सदस्य
12. सभापती, शिर्डी नगर पंचायत

११ जणांची निवड; ६ जागा शिल्लक
साईबाबा संस्थानचं विश्वस्त मंडळात एकूण १७ सदस्य असतात. त्यातील तात्पुरत्या स्वरूपात ११ अशासकीय सदस्य नियुक्त केले गेले आहेत. यात राष्ट्रवादीच्या ५, काँग्रेसच्या ४ आणि शिवसेनेच्या २ जणांचा समावेश आहे. अद्याप ६ जणांची नियुक्ती शिल्लक आहे. त्यात शिवसेनेचे ३, काँग्रेसचे २ आणि राष्ट्रवादीचा १ सदस्य असेल.

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच
साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कोण असणार यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरू होती. मुंबईच्या सिद्धीविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद शिवसेनेकडे गेल्याने शिर्डीच्या साईबाबा संस्थान अध्यक्षपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वाटाघाटी सुरू होत्या. अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार असल्यामुळे विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादीने दावा केला होता.

Web Title: NCP MLA Ashutosh kale Appointed as President of shirdi saibaba sansthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.