रस्त्यावर किलोमीटरचे दगड का असतात विशिष्ट रंगानी रंगवलेले? जाणून घ्या रंजक कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 04:38 PM2022-01-16T16:38:01+5:302022-01-16T16:40:02+5:30

किलोमीटरचे आकडे दाखवणाऱ्या दगडांचा वरचा भाग वेगवेगळ्या रंगाने रंगवण्याला एक विशेष अर्थ आहे. चला तर जाणून घेऊयात कोणत्या रंगाच्या दगडाचा काय अर्थ असतो.

meaning of milestones in Indian roads | रस्त्यावर किलोमीटरचे दगड का असतात विशिष्ट रंगानी रंगवलेले? जाणून घ्या रंजक कारण

रस्त्यावर किलोमीटरचे दगड का असतात विशिष्ट रंगानी रंगवलेले? जाणून घ्या रंजक कारण

googlenewsNext

एखाद्या रस्त्यावरून (road) प्रवास ( traveling ) करताना रस्त्याच्या कडेला किलोमीटरचे (kilometers) आकडे दाखवण्यासाठी लावलेले दगड (stones) आपलं लक्ष्य वेधून घेतात. तुम्हाला माहिती आहे का, प्रवासाला जाताना या दगडांच्या रंगांवरून ( colors ) अंतरासोबत रस्त्याचा अंदाज बांधता येऊ शकतो. या दगडांना मैलाचे दगड म्हणतात. शहराचे नाव आणि अंतर दर्शवलेल्या या दगडांचे रंग वेगवेगळे का ? निळा, पिवळा, हिरवा, नारंगी अशा वेगवेगळ्या रंगांनी ( different colors ) या दगडांचे शेंडे का रंगवलेले जातात ? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. किलोमीटरचे आकडे दाखवण्यासाठी असणारे हे दगड रंगवण्यामागे खास कारणं आहे. हा प्रत्येक रंग काहीतरी सांगत असतो.

किलोमीटरचे आकडे दाखवणाऱ्या दगडांचा वरचा भाग वेगवेगळ्या रंगाने रंगवण्याला एक विशेष अर्थ आहे. चला तर जाणून घेऊयात कोणत्या रंगाच्या दगडाचा काय अर्थ असतो.

हिरवी पट्टी असलेले माइलस्टोन (Green Milestones)
- हिरवा-पांढऱ्या रंगाचा मैलाच्या दगडाचा अर्थ असा होतो की, तुम्ही राज्य महामार्गावरून प्रवास करत आहात. हे रस्त राज्यातील विविध शहरांना एकमेकांशी जोडतात. 2016 च्या आकडेवारीनुसार, भारतातील राज्य महामार्गाचे जाळे 1 लाख 76 हजार 166 किलोमीटर पसरलेले आहे.

काळी किंवा निळी पट्टी असलेले माइलस्टोन्स (Black or Blue & White Strips)
- प्रवासादरम्यान निळ्या आणि पांढऱ्या किंवा काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा दगड दिसल्यास तुम्ही एखाद्या शहरी किंवा जिल्हा मार्गावर आहात, असं समजावं. भारतात अशा रस्त्यांचे जाळे 5 लाख 61 हजार 940 किमी आहे.

पिवळ्या रंगाची पट्टी असलेले माइलस्टोन्स (Yellow Strips)
- पिवळा-पांढऱ्या रंगाचा मैलाचा दगड राष्ट्रीय महामार्ग दर्शवण्यासाठी वापरला जातो. जेव्हा तुम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करीत असाल, तेव्हा तुम्हाला अनेकदा मैलाच्या दगडावर फिकट पिवळे पट्टे दिसतील.नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, भारतातील राष्ट्रीय महामार्ग 1 लाख 51 हजार 19 किमी आहे.

नारिंगी रंगाची पट्टी असलेले माइलस्टोन्स (Orange Strips)
- अनेक वेळा रस्त्याच्या कडेला असलेल्या मैलाचा दगड हा नारंगी-पांढऱ्या रंगाचा असल्याचे दिसते.हा दगड पाहून तुम्ही ग्रामीण रस्त्यावरून प्रवास करीत आहात, हे समजू शकते. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जवाहर रोजगार योजना आणि इतर योजनांच्या माध्यमातून गावांमध्ये बांधण्यात आलेल्या रस्त्यांवरील दगड नारिंगी- पांढऱ्या रंगाचे असतात. भारतातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे सुमारे 3.93 लाख किमी आहे.

प्रवासा दरम्यान तुम्हाला रस्त्याच्या कडेला किलोमीटरचे आकडे दाखवण्यासाठी दगड दिसल्यास, त्या दगडाच्या रंगावरून तुम्ही सहज सांगू शकता की तुम्ही प्रवास करीत असणाऱ्या रस्त्याचा नेमका प्रकार कोणता आहे.

Web Title: meaning of milestones in Indian roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.