लॉकडाऊनमध्ये नेटिझन्सचे टेम्परेचर वाढवतेय ही हसिना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 02:39 PM2020-04-27T14:39:00+5:302020-04-27T14:40:02+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मिनिषा लांबा भलेही बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्टिव्ह नसली तरी सोशल मीडियावर बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते.

नुकतेच मिनिषाने सोशल मीडियावर बिकनीतील बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये मिनिषा अतिशय हॉट दिसत असल्याचे तिचे फॅन्सला तिला सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत.

मिनिषाने तिचे बिकनीतील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्याची ही पहिली वेळ नाहीये... ती नेहमीच तिचे हॉट अँड ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

कॉलेजमध्ये शिकत असतानाच मिनिषाला चित्रपट ऑफर झाला आणि 2005 मध्ये सुजीत सरकारच्या चित्रपटातून तिचा डेब्यू झाला.

2008 मध्ये रणबीर कपूरसोबत ‘बचना ऐ हसीनों’ मध्ये तिची वर्णी लागली. हा चित्रपट सुपरहिट झाला.

मिनिषा कॉपोर्रेट, हनीमून ट्रेवल्स प्राइवेट लिमिटेड, दस कहानियां अशा अनेक सिनेमांतमध्ये झळकली आहे.

मिनिषाचे चित्रपट फ्लॉप होत असल्याने तिने एक वेगळे क्षेत्र निवडणे पसंत केले. आता ती एक प्रोफेशनल पोकर प्लेअर बनली आहे.