मोठी बातमी; आज मध्यरात्रीपासून एसटीचे प्रवास भाडे १७.१७ टक्क्यांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 06:48 PM2021-10-25T18:48:49+5:302021-10-25T18:49:38+5:30

१७.१७ टक्क्यांनी झाली वाढ : प्रस्तावित भाडेवाढीला मंजुरी

Big news; ST fares have gone up by 17.17 per cent since midnight today | मोठी बातमी; आज मध्यरात्रीपासून एसटीचे प्रवास भाडे १७.१७ टक्क्यांनी वाढले

मोठी बातमी; आज मध्यरात्रीपासून एसटीचे प्रवास भाडे १७.१७ टक्क्यांनी वाढले

googlenewsNext

सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांमधून अर्थात एसटी गाड्यांमधून प्रवास करताना आता सर्वसामान्यांच्या खिशाला झटका बसणार आहे. आज मध्यरात्रीपासून एसटीच्या प्रवासभाड्यात १७.१७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याबाबत नुकतेच अध्यादेश काढण्यात आला आहे. 

मागील काही दिवसांपासून डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे एसटीला मोठा तोटा सहन करावा लागत होता. त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी तिकिटाच्या दरात वाढ करणे हाय पर्याय  प्रशासना समोर होता. यामुळे तिकीट दरवाढ होणार जवळपास निश्चित मानले जात होते. याबाबत सोमवारी दरवाढीच्या आदेश काढण्यात आला आहे. यामुळे आता शंभर रुपयांना जवळपास १७ रुपये १७ पैसे जास्त द्यावे लागणार आहे. अर्थात जर पुण्याला जायचे असेल पूर्वी जवळपास तीनशे पंचवीस रुपये तिकीट होते. आता प्रवाशांना यासाठी साठ रुपये जादा मोजावे लागणार आहे.

Web Title: Big news; ST fares have gone up by 17.17 per cent since midnight today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.