"आम्ही केऱ्हाळेकर" व्हॉट्सअॅप ग्रुपने दिली दिव्यांगाना मायची ऊब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 07:30 PM2018-12-04T19:30:07+5:302018-12-04T19:32:09+5:30

जागतिक अंपग दिनाचे औचित्य साधुन गांवातील दिव्यांगाना मायची ऊब देत पुन्हा एक सोशल मिडीयाच्या माध्यमातुन नवा आदर्श निर्माण केला आहे.

"We Karehalekar" Whatsapp Group gives love to Divyangana | "आम्ही केऱ्हाळेकर" व्हॉट्सअॅप ग्रुपने दिली दिव्यांगाना मायची ऊब 

"आम्ही केऱ्हाळेकर" व्हॉट्सअॅप ग्रुपने दिली दिव्यांगाना मायची ऊब 

googlenewsNext

के-हाळा (औरंगाबाद ) सिल्लोड तालुक्यातिल के-हाळा येथील बहुचर्चित असलेल्या सोशल मिडीयातिल 'आम्ही के-हाळेकरां'नी जागतिक अंपग दिनाचे औचित्य साधुन गांवातील दिव्यांगाना मायची ऊब देत पुन्हा एक सोशल मिडीया च्या माध्यमातुन नवा आदर्श निर्माण केला आहे.

मागिल अनेक दिवसापासुन सोशल मिडीयाच्या वापरातुन सामाजिक परिवर्तनाची चळवळ हाती घेतलेला व्हॉट्सअॅप ग्रुप म्हणजेच सिल्लोड तालुक्यातिल के-हाळा येथील 'आम्ही के-हाळेकर' ग्रुप म्हणून सध्या जिल्हाभरात बहुचर्चेचा विषय ठरत आहे. या व्हॉट्सअॅप ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातिल सदस्य आसुन या ग्रुपवर नेहमिच सर्वात जलद न्युज,गांवचा विकास,पाणी फांउडेशन,दुष्काळाशी शेतक-यांनी करायचा सामना,दुष्काळात पाण्याचे योग्य नियोजन, गांव स्वच्छ आरोग्य निरोगी. या सारख्या अनेक विषयावर कायमच चर्चा होते.व त्या चर्चेच्या माध्यमातुन गांवातील सर्व घटकातिल समस्याकडे सामाजिक दर्ष्टीकोन ठेवत विविध उपक्रम राबविण्याचा मोठा निर्णय घेतला जातो.
मागिल महीण्यात के-हाळा गांवातिल चार वर्षापासुन रेंगाळलेल्या रस्त्याविषयी चर्चा करुन अवघ्या दोन दिवसातच वर्गनी जमा करुन गांवातील रस्ता गुळगुळीत करुन ग्रामस्थांच्या मनात नवा आदर्श निर्मान केला होता. त्याचप्रमाणे 3 डिसेंबर जागतिक अंपगदिनाचे औचित्य साधुन गांवातिल दिव्यांग  बांधवाना एकत्र करुन त्यांना शाल,श्रीपळ,पाणी बाँटल व पेडे, भरावुन स्वागत करत अंपगाना जगातिक विषयाची  माहीती संकल्लीत व्हावी म्हनुन प्रत्येक दिव्यांगास  लोकमतचा 200रुपये किमतीचा वाचनिय दिपउत्सव अंक देऊन सर्वाना गौवरविण्यात आले.

दिव्यांगाचा  सत्कार होताच काही दिव्यांगानी भावनिक होत आपल्या भावना व्यक्त केल्या.या आगोदरही आमचा सत्कार व्हावा ही अपेक्षा होती.पंरतु वयाचे अनेक वर्ष निघुन गेले तरी कुनीही दिव्यांगांन विषयी अस्था  दाखविली नाही असे म्हनत हा व्हाटसप ग्रुप एक दिवस नक्कीच जिल्हयात नवा आदर्श निर्मान करुन गांवाचे नाव लौकिक करेल असे भाऊक उदगार त्या दिव्यांग संजय पांढरे,व शेख अनिस यांनी काढले.  या कार्यक्रमात दिव्यांग संजय गणपत पांढरे,ज्ञानेश्वर महादु पांढरे,गणेश विश्वनाथ गंगावने,रियाज शेख बुढन,असरा दत्ता पांढरे,शेख अनिस मोहमद कैसर,शेख ईम्रान बुढन यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पोलिस पाटिल संजय दांरुटे,तंटामुक्ती आध्यक्ष सांडेखाँ पठान,ग्रुप चे प्रकाश पाटिल,सुर्यभान बन्सोड,संजय दारुंटे,आजिनाथ भिंगारे,दत्ता पांढरे,विलास शेळके,राजीव पांढरे,उध्दव गिरी,राजु राजपुत,कैलास शेळके,शंकर सोनवने,राहुल शळके,राजु लोखंडे,विजय कळम,आजिनाथ पांढरे,प्रकाश जोशी,प्रभाकर पवार,गणेश पांढरे,जनार्धन बोराडे,विनोद ऐंडोले,रमेश गंगावने,भरत दारुंटे सह ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थीत होते.

Web Title: "We Karehalekar" Whatsapp Group gives love to Divyangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.