तेजश्री प्रधानचा वधूच्या रूपातील फोटो तुम्ही पाहिला का?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 12:16 PM2017-12-06T12:16:35+5:302017-12-06T17:46:35+5:30
छोट्या पडद्यावरील रसिकांची लाडकी जान्हवी म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान. 'होणार सून मी' या घरची या मालिकेतील तेजश्रीच्या भूमिकेने रसिकांच्या ...
छ ट्या पडद्यावरील रसिकांची लाडकी जान्हवी म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान. 'होणार सून मी' या घरची या मालिकेतील तेजश्रीच्या भूमिकेने रसिकांच्या मनावर जादू केली. या मालिकेने रसिकांचा निरोप घेतला असला तरी तेजश्रीने साकारलेली जान्हवी आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. त्यामुळे तेजश्रीबाबतची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. तिचे सध्या काय सुरू आहे, कोणत्या मालिकेत, नाटकात किंवा सिनेमात ती काम करते याबाबत माहिती घेण्याची तिच्या फॅन्सना उत्सुकता असते. तेजश्रीचे लाखो फॅन्सला तिला सोशल मीडियावरही फॉलो करतात. सध्या सोशल मीडियावरील तेजश्रीचा एक फोटो साऱ्यांसाठीच चर्चेचा विषय ठरतो आहे. विशेषतः तिच्या फॅन्ससाठी तेजश्रीचा हा फोटो उत्सुकतेचा विषय ठरला आहे. या फोटोत तेजश्री एका नववधूप्रमाणे दिसत आहे. या फोटोत तेजश्रीचे सौंदर्य खुलून गेल्याचे पाहायला मिळत आहे. तेजश्रीचा नववधूच्या वेशातील हा फोटो तिच्या खऱ्या आयुष्यातील नसून हा एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान काढलेला आहे. तेजश्रीनेच तो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे.
तेजश्री बबलू बॅचलर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा फोटो तेजश्रीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अग्निदेव भट्टाचार्य करत आहेत. या चित्रपटात तेजश्रीची जोडी शर्मन जोशीसोबत जमणार आहे. तेजश्रीने याआधी देखील शर्मन सोबत काम केले आहे. मैं और तुम या नाटकात या दोघांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.
होणार सून मी या घरची या मालिकेतील जान्हवी या भूमिकेमुळे तेजश्री प्रधान घराघरात पोहोचली. या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ही मालिका संपल्यानंतर अभिनेता प्रशांत दामले यांच्यासह तिने कार्टी काळजात घुसली या नाटकात काम केले. याशिवाय ती सध्या काय करते या मराठी सिनेमातही ती झळकली. सध्या ती सूर नवा, ध्यास नवा या मराठी रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहे.
Also Read : सूत्रसंचालन करताना मुखवटा नसतो : तेजश्री प्रधान !