विद्यापीठातील कंत्राटी प्राध्यापकांची पाच वर्षांसाठी नियुक्ती होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:27 AM2021-07-30T04:27:32+5:302021-07-30T04:27:32+5:30

विद्यापीठामध्ये सध्या कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेच्या अधिविभागांमध्ये सध्या ८४ नियमित प्राध्यापक, तर ७८ कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक कार्यरत आहेत. त्यातील ...

The contract professors of the university will be appointed for five years | विद्यापीठातील कंत्राटी प्राध्यापकांची पाच वर्षांसाठी नियुक्ती होणार

विद्यापीठातील कंत्राटी प्राध्यापकांची पाच वर्षांसाठी नियुक्ती होणार

Next

विद्यापीठामध्ये सध्या कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेच्या अधिविभागांमध्ये सध्या ८४ नियमित प्राध्यापक, तर ७८ कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक कार्यरत आहेत. त्यातील कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांची दरवर्षी अकरा महिन्यांसाठी नियुक्ती केली जाते. विद्यापीठाकडून नियुक्ती प्रक्रिया प्रत्येक वर्षी राबविली जाते. त्यात वेळ, तर जातोच पण, दरवर्षी अधिकतर अधिविभागातील सहाय्यक प्राध्यापक बदलतात. त्याचा फटका शैक्षणिक गुणवत्तेला बसतो. त्यामुळे विद्यापीठाने पाच वर्षांसाठी नियुक्ती करावी. ज्यामुळे विद्यापीठातील संशोधन व गुणवत्तावाढीस मदत होईल. समान ४० हजार वेतन द्यावे. परीक्षेचे काम द्यावे. सध्या नोकरभरती बंदी असल्याने विद्यापीठाने पुनर्नियुक्तीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी कंत्राटी प्राध्यापकांकडून वारंवार करण्यात येत होती. त्याबाबत विद्यापीठाने सकारात्मक दृष्टिकोनातून कार्यवाही करत व्यवस्थापन परिषदेसमोर विषय ठेवला. या परिषदेने कंत्राटी प्राध्यापकांची पाच वर्ष कालावधीसाठी नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे या सहाय्यक प्राध्यापकांना दिलासा मिळणार आहे.

Web Title: The contract professors of the university will be appointed for five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.