धक्कादायक! 'बर्थडे' पार्टीसाठी तळजाई जंगलात नेलं अन् तरुणीवर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 01:58 PM2021-12-07T13:58:53+5:302021-12-07T15:13:34+5:30

पुणे : वाढदिवसांच्या पार्टीसाठी बोलावून तरुणीला तळजाईच्या जंगलात नेले. तेथे दारु पिल्यानंतर तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

rape young girl taljai forest sahakarnagar pune molestation | धक्कादायक! 'बर्थडे' पार्टीसाठी तळजाई जंगलात नेलं अन् तरुणीवर केला बलात्कार

धक्कादायक! 'बर्थडे' पार्टीसाठी तळजाई जंगलात नेलं अन् तरुणीवर केला बलात्कार

googlenewsNext

पुणे : वाढदिवसांच्या पार्टीसाठी बोलावून तरुणीला तळजाईच्या जंगलात नेले. तेथे दारु पिल्यानंतर तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी युवकाला अटक केली आहे. शुभम सिताराम शिंदे (वय १९, रा. सह्याद्रीनगर, धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कात्रज येथील एका २२ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. शुभम याने फिर्यादी तरुणीला ५ डिसेंबर रोजी वाढदिवसाची पार्टी आहे, तू तळजाई शेवटचा बसस्टाूप येथे ये असे सांगितले. त्याप्रमाणे ती सायंकाळी ५ वाजता तेथे आली. आरोपीने त्याचा मित्र प्रतिक माने व फिर्यादी यांना तळजाई येथील जंगलात नेले. तेथे ते दोन ते अडीच तास दारु पित बसले होते. फिर्यादी तरुणीला थंडी वाजत असल्याने ती कडेला झोपली असताना शुभम याने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची माहिती तिने सहकारनगर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी शुभम याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देसाई तपास करीत आहेत.

Web Title: rape young girl taljai forest sahakarnagar pune molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.