राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2021 05:00 AM2021-11-08T05:00:00+5:302021-11-08T05:00:51+5:30

नाकाडोंगरी राज्य मार्गावरील जड वाहतूक तुमसर-बपेरा राष्ट्रीय महामार्गावर वळते करण्यात आली आहे. यामुळे वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. जड वाहतूक वळविण्यात आली असली, तरी मार्गाची अवस्था खड्ड्यात गेली आहे. राज्यमार्ग असणाऱ्या तुमसर-बपेरा मार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आल्यानंतर चौपदरीकरणच्या कामांना सुरुवात करण्यात आली नाही. आधी राज्यमार्ग घोषित असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा मार्गाचे नूतनीकरण करीत असे, परंतु तसे चित्र आजघडीला नाहीत.

A life-threatening journey on a national highway | राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणा प्रवास

राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणा प्रवास

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आलेल्या तुमसर-बपेरा मार्गावरील वाढत्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मणक्यांचा त्रास वाढला असून अपघातात वाढ झाली आहे. महामार्ग बांधकामाला विलंब होत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. जलद गतीने कामे सुरू करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते एकवटले आहेत. 
नाकाडोंगरी राज्य मार्गावरील जड वाहतूक तुमसर-बपेरा राष्ट्रीय महामार्गावर वळते करण्यात आली आहे. यामुळे वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. जड वाहतूक वळविण्यात आली असली, तरी मार्गाची अवस्था खड्ड्यात गेली आहे. राज्यमार्ग असणाऱ्या तुमसर-बपेरा मार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आल्यानंतर चौपदरीकरणच्या कामांना सुरुवात करण्यात आली नाही. आधी राज्यमार्ग घोषित असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा मार्गाचे नूतनीकरण करीत असे, परंतु तसे चित्र आजघडीला नाहीत. खड्डे बुजविण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभाग करीत असल्याने वाहनधारकांना त्रास जाणवत नव्हता. यानंतर राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आल्यानंतर मार्गाची दुरुस्ती अडली आहे. महामार्ग खड्ड्यात गेल्याने वाहनधारकांना कमरेचे त्रास वाढले आहेत. मणक्याच्या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. सिहोरा परिसरातून गेलेल्या या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था वाईट झाली आहे. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग अरुंद असल्याने दुहेरी वाहने चालविताना जिकिरीचे ठरत आहे. अपघाताची शृंखला सुरू झाली आहे. 
सिहोरा ते चुल्हाड गावापर्यंत वाहने रस्त्यावर आदळत आहे. मार्ग दुहेरी भागात वगळण्यात आल्याने दुचाकीस्वारांचे अपघात वाढले आहे, परंतु चौपदरीकरणाच्या कामांना सुरुवात करण्यात आली नाही. दरम्यान, नाकाडोंगरी मार्गावरील बावनथडी नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत चौपदरीकरणच्या कामांना सुरुवात होणार नाही, अशी माहिती मिळाली आहे. लगेच या मार्गाचे चौपदरीकरणाच्या कामांना सुरुवात केल्यास मार्ग बांधकामावरून समस्या व अडचण निर्माण होऊ शकतो, असा कयास लावले जात आहे. भंडारा ते बालाघाट असे नावारूपास आलेल्या या चौपदरीकरण मार्गाचे बांधकामात तुमसरचा बायपास मार्ग अडचणीचे ठरत आहे. या मार्गाचे आधी बांधकाम पूर्ण करणे गरजेचे होणार आहे. बिनाखी ते बपेरापर्यंत या राष्ट्रीय मार्गावरून पायदळ चालता येत नाही. महामार्गावर खिंडारी पडल्या आहेत. या महामार्गाचे दोन्ही कडेला झुडपे वाढले आहेत. झुडपाची स्वच्छता करण्यात येत नाही. यामुळे विकास मंदावला आहे. 
महामार्गाचे तत्काळ चौपदरीकरणची कामे सुरू करण्याची मागणी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवेंद्र मेश्राम, संतोष बघेले, सरपंच पारस भुसारी, सरपंच अनिता बघेले, सरपंच वैशाली पटले, सरपंच ममता राऊत, सरपंच कंचन कटरे, सरपंच सुषमा पारधी, सरपंच पमु भगत, सरपंच राजेश बारमाटे, सरपंच नितीन गणवीर,  आशा लांजे, विमल काणतोडे, सरपंच चंदा ठाकरे, भाजयुमोचे उपाध्यक्ष विनोद पटले, माजी उपसरपंच कंठीलाल ठाकरे, देवानंद लांजे, हेमराज लांजे, धनराज भगत, खुमान शरणागत, गुड्डू श्यामकुवर यांनी केली आहे. 

माडगी ते बपेरा रस्त्याचे नूतनीकरण करा
-  वैनगंगा नदीच्या काठालगत असणाऱ्या गावांना जोडण्यासाठी माडगी ते बपेरा असे रस्ते विकास कृती आराखड्यात नोंद करण्यात आली आहे. २८ किमी अंतरपर्यंत लांब असणाऱ्या या मार्गाचे दुरुस्तीचे कार्य राज्य अखत्यारीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे. या मार्गावर ग्रामीण गावे आहेत. रस्त्याचे चित्र भकास झाले आहे. खड्डे पडले आहेत. या मार्गावर चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातील बहुतांश गावे आहेत. रस्ता नादुरुस्त असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पूरग्रस्त गावांना न्याय देण्यासाठी आमदार राजू कारेमोरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश कटरे यांनी दिली आहे. निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

 

Web Title: A life-threatening journey on a national highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.