OMG!! तुफान व्हायरल होतोय फराह खानच्या लेकीचा हा व्हिडीओ, पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 12:55 PM2020-03-11T12:55:56+5:302020-03-11T12:56:36+5:30

अ‍ॅक्टर, डायरेक्टर, कोरिओग्राफर फराह खान हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला.

farah khan duaghter anya eating buscuits by her foot-ram | OMG!! तुफान व्हायरल होतोय फराह खानच्या लेकीचा हा व्हिडीओ, पाहून व्हाल थक्क

OMG!! तुफान व्हायरल होतोय फराह खानच्या लेकीचा हा व्हिडीओ, पाहून व्हाल थक्क

googlenewsNext
ठळक मुद्देफराह खानने 2004 साली फिल्ममेकर शिरीष कुंदरसोबत लग्न केले.

अ‍ॅक्टर, डायरेक्टर, कोरिओग्राफर फराह खान हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला. या व्हिडीओत फराह खानची लेक अन्या सोफ्यावर झोपून पायाने बिस्किट खाताना दिसतेय.
फराहने स्वत: हा व्हिडीओ शेअर केला. ‘स्वत:ला एंटरटेन करणे गरजेचे आहे. अन्या हेच करतेय. पण तुम्ही हे घरी करून पाहण्याचा प्रयत्न करू नका. ती एक ट्रेंड बेली डान्सर आहे,’ असे हा व्हिडीओ शेअर करताना फराहने लिहिले आहे.


फराहने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तिच्या लेकीचे चांगलेच कौतुक होतेय. अगदी बॉलिवूडचे अनेक कलाकारही तिचे कौतुक करताना थकत नाहीयेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर रितेश देशमुखपासून सोनू सूदपर्यंत अनेकांनी कमेंट केल्या.


 हा व्हिडीओ पाहिल्यानंतर रितेश देशमुख फराहची जरा फिरकी घेताना दिसला. ‘फराह, तू सुद्धा असा प्रयत्न करावा, अशी माझी इच्छा आहे,’ असे त्याने लिहिले. विशेष म्हणजे, फराहने यावर लगेच उत्तरही दिले. ‘तुला काय वाटतं, तिला हे करायला कुणी शिकवले असेल?’ असे तिने लिहिले.
सोनू सुदने या व्हिडीओवर मजेशीर कमेंट केली. ‘कानून के हाथ और अन्या की लात दोनों बहुत लंबे है भैय्या,’ असे त्याने लिहिले.

फराह खानने 2004 साली फिल्ममेकर शिरीष कुंदरसोबत लग्न केले. फराहला एक मुलगा व दोन मुली आहेत. 2008 मध्ये फराहने या तिळ्यांना जन्म दिला होता. शिरीष आणि फराहची ओळख पहिल्यांदा ‘मै हूं ना‘च्या सेटवर झाली. सेटवर दोघांची नेहमी भांडण व्हायची. त्यावेळी  हे दोघं लग्न करतील असा विचार देखील कुणी केला नव्हता. एकदिवशी अचानक शिरीषने फराहला प्रपोज केले. त्यावेळी फराह 32 वर्षांची होती तर शिरीष 25 वर्षांचा. फराहने शिरीषला होकार देण्यासाठी बराच वेळ घेतला होता.

Web Title: farah khan duaghter anya eating buscuits by her foot-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.