सलमानसोबत काम करायला मी उत्सुक- तापसी पन्नू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2017 01:23 PM2017-07-07T13:23:39+5:302017-07-07T13:34:56+5:30
सलमान खानसोबतचा तो सीन शूट करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं तापसी सांगते.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7- "पिंक" सिनेमातील दमदार अभिनयानंतर अभिनेत्री तापसी पन्नू हिने तिचा नवा फॅन क्लब तयार केला आहे. पिंकनंतर "बेबी" सिनेमाचा प्रिक्वल असणाऱ्या "नाम शबाना" या सिनेमात पुन्हा एकदा तापसीच्या अभिनयाची वेगळी छटा प्रेक्षकांना बघायला मिळाली. या दोन धमाकेदार सिनेमांनंतर आता अभिनेत्री तापसी पन्नू "जुडवा 2" या जुडवा सिनेमाच्या सिक्वलमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं शूटिंग सध्या सुरू असून तापसीने तिच्या भूमिकेचं 75 टक्के शूटिंग पूर्ण केलं आहे. या सिनेमात एका सीनमध्ये अभिनेता सलमान खानही असणार आहे. सलमान खानसोबतचा तो सीन शूट करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं तापसी सांगते. सलमानसोबतचा तो खास सीन शूट करण्यासाठी तापसी विशेष मेहनत घेते आहे तसंच तिचं संपूर्ण लक्ष आता त्या एका सीनकडे लागलं आहे.
जुडवा 2 हा सिनेमा 1997 मधील ब्लॉकबस्टर हीट सिनेमा जुडवाचा सिक्वल आहे. जुडवामध्ये अभिनेता सलमान खानने दुहेरी भूमिका साकारली होती. आता सिनेमाच्या सिक्वलमध्ये अभिनेता वरूण धवन प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
सिनेमाचं शूटिंग मस्त सुरू आहे, लवकरच ते पूर्ण होणार आहे. सिनेमातील दोन गाणी आणि सलमान खानबरोबरचा एक सीन शूट होणं बाकी आहे. लवकरच त्याचंही शूटिंग पूर्ण होइल. या सीनसाठी सलमानला भेटायला मी अतिशय उत्सुक असून पहिल्यांदाच मला त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मिळणार आहे, असं तापसीने माध्यमांशी बोलताना सांगितलं.
आणखी वाचा
गणेश आचार्यने दीड वर्षात घटवलं 85 किलो वजन
...त्यांची अर्धांगिनी असल्याचा मला अभिमान
सेलेब्सचे ‘मॉर्निंग सेल्फीज’!
जुडवामधील "ऊंची है बिल्डिंग" आणि "टन टना टन" ही दोन गाणी जुडवा 2 मध्येही प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. तापसीने नुकतंच या गाण्यांचं शूटिंग पूर्ण केलं आहे. या दोन्ही गाण्यांचं शूट करताना आम्ही खूप मजा केली आहे. लहानपणापासून ही दोन गाणी मी ऐकत असल्याने त्यासाठी आत्ता शूट करणं मी खूप एन्जॉय केल्याचं तिने सांगितलं आहे.
सिनेमात प्रमुख भूमिकेत असणाऱ्या वरूण धवनने काही दिवसांपूर्वी सिनेमातील क्रायमॅक्स सीनचं शूटिंग पूर्ण केलं होतं. वरूणने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या सीनबद्दल सांगितलं.
डेविड धवन यांचं दिग्दर्शन असणाऱ्या सिनेमात अभिनेता वरूण धवन, तापसी पन्नू आणि जॅकलिन फर्नान्डीस हे कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत.